
देशात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) विरोधात अनेक तक्रारी येत असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, पेंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांना एसआयआर नोटिसा बजावल्या आहेत. नवी माहिती मागील मतदार यादीशी जुळत नसल्याच्या कारणामुळे या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

























































