लालू प्रसाद यादव यांच्यासह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalu prasad yadav

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह 17 जणांविरुद्ध दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने शुक्रवारी समन्स जारी केले आहे. या सर्वांना 4 ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.

लँड फॉर जॉब्स प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्धचे आरोपपत्र कोर्टाने मंजूर केले आहे. सीबीआयने पहिल्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आरोपी बनवले आहे. हे काही पहिले आणि शेवटचे प्रकरण नाही. हे चालूच राहणार आहे. यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. या सर्व प्रकरणात काही दम नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी गृह मंत्रालयाने 12 सप्टेंबरला परवानगी दिली आहे.