
सामना प्रतिनिधी। वाढवणा
राचन्नावाडी येथे शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन महिलेस अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाण प्रकरणी वाढवणा बु.पोलीस ठाण्यात गीता सतीश म्हेत्रे यांनी तक्रार दाखल केली. 3 जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतीच्या वाटणीच्या कारणावरुन सचिन वामन पोंदे, छाया वामन पोंदे, बालिका नागोराव घुगे, दादाराव शेषेराव घुगे आणि दयानंद दादाराव घुगे या पाचजणांनी संगणमत करुन अश्लिल शिवीगाळ केली. फिर्यादीच्या छातीवर बसून वाईट हेतूने लाथा बुक्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

































































