लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा,  2 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलिसांनी पोलीस ठाणे निलंगा हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी करून 2 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 33 व्यक्तींविरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर निलंगा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणार्‍या मटका जुगारावर एकाच वेळी विविध पथके तयार करून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 4 जानेवारी रोजी निलंगा येथे वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच रूम मध्ये काही इसम मटका खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी निलंगा येथील शिवाजी चौक ते बँक कॉलनी जाणारे रोडवर, बँक कॉलनी परिसरात, औराद ते निलंगा जाणारे रोडवरील परिसरात, पिराजी नवनाथ कांबळे यांचे पत्र्याच्या घरामध्ये अशा चार ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून बेकायेशीररित्या मटका जुगार खेळणाऱ्या 33 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 94 हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे निलंगा मध्ये खालील नमूद इसमाविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 12(अ) कायद्यान्े प्रमाणे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माजिद अब्दुलगणी खडके (35) रा. इरिगेशन ऑफीस समोर शिवाजीनगर निलंगा, बालाजी प्रभू गायकवाड (48) रा. जेवरी ता. निलंगा, भगवान माधव वाडीकर (42) रा. मसोबाचीवाडी ता. निलंगा, समदानी जाफर सौदागर (40) रा. शिवाजीनगर चांदसाबी मोहल्ला निलंगा, शहाबाद उस्मान पठाण (21) रा. बागवान गल्ली पीरपाशा रोड निलंगा, इरफान शेख रा. निलंगा, वाजिद रुक्मोदिन पठाण (40) रा. समता नगर मुबारकपूर निलंगा, ज्ञानोबा बाजीराव गवारे (70) रा. केवळगाव ता. निलंगा, ज्ञानेश्वरी मल्हारी त्रिमुखे (29) रा. पेठ निलंगा, रियाज नुरुद्दीन कुरेशी (29) रा. शिवाजीनगर निलंगा, नितीन यादव कांबळे ( 26) रा. शिवाजीनगर निलंगा, ऋषिकेश लक्ष्मण कांबळे (22) रा. रामेगाव ता. औसा, विशाल अंकुश कांबळे रा. पेठ निलंगा, अख्तर रुक्मुद्दीन फकीर (45) रा. पीरपाशा दर्गा रोड निलंगा, महबुब रुक्मुद्दीन फकीर ( 55) रा. पीरपाशा दर्गा रोड निलंगा, विठ्ठल व्यंकटराव माने ( 55) रा. अंतरवाडा ता. निलंगा, कृष्णा शिवाजी पोतदार (27) रा. बँक कॉलनी निलंगा, उल्हास शिवलिंगप्पा दिवटे ( ५०) रा. दुर्गा नगर महारूद्र चौक निलंगा, विक्रम किशनराव शेंडगे ( 33) रा. गांधीनगर निलंगा, शंकर गोपाळ हिरास ( 27) रा. महारुद्र चौक निलंगा, संदीप सुरेश गाडचिले ( 27) रा. हनुमंतवाडी ता. निलंगा, उध्दव राजाराम पवार (55) रा. जामगाव ता. निलंगा, लक्ष्मण श्रीपती बोयणे ( 60) रा. लिंबाळा ता. निलंगा, श्याम वसंत वरंगले (30) रा. जाऊवाडी ता. निलंगा, टिल्लू नीला रा. आदर्श कॉलनी निलंगा, संतोष भगवान कांबळे ( 45) रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा, सागर रामू क्षीरसागर ( 32) रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा, ज्ञानेश्वर राम सुरवसे ( 29) रा. सिंदखेड ता. निलंगा, विलास निवृत्ती शेळके (50) रा. रामेगाव ता. औसा, महादेव शिवाजी मदने ( 25) रा. माळी गल्ली निलंगा, भीमा राजेंद्र कांबळे ( 28) रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा, अनिल पुरुषोत्तम नूतन नवरे ( 50) रा. इंद्रा चौक निलंगा, संतोष महादेव कांबळे ( 35) रा. वीर लहुजी साळवे नगर निलंगा आदीजण मटका नावाचा जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणार्‍यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारून कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 4 डिसेंबर रोजी रोजी पोलीस ठाणे निलंगा येथे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास निलंगा पोलीस करीत आहेत.