लातूर – हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 1 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा मारुन 1 लाख 89 हजाराचा हातभट्टीची दारु जप्त केली व नष्ट केली चार जणांना अटक केली.

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मौजे कोराळवाडी, तालुका निलंगा येथील शेतामध्ये अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या जागी छापेमारी केली. या कारवाईमध्ये किंमत 1 लाख 89 हजार रुपये 5600 लिटर रसायन आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले.

या कारवाईत मधुकर लिंबाजी मेलगीरे, हरिश्चंद्र लक्ष्मण रेवणे, युवराज श्रीपती रेवणे, विठ्ठल लिंबाजी मेलगिरे (सर्व राहणार कोराळवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर) अशा एकूण चार आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या