
राक्षसभुवनमध्ये एका शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये बिबट्या दिसला. घाबरलेल्या शेतकऱ्याने याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थांनी शेतात धाव घेत बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीच हालचाल करत नसल्याचे दिसले. त्यामुळे सावधपणे पुढे जाऊन पाहिल्यावर बिबट्या मृत असल्याचे समजले. मृत बिबट्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे सुरेश नाटकर यांच्या शेतामध्ये एका ओढ्याच्या पात्रात बिबट्या सापडला. त्या शेतकऱ्याने गावकऱ्यांना ही माहिती दिली. झोपलेल्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. मात्र, त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. गावकऱ्यांनी सावधतेने पुढे जाऊन पाहिले असता बिबट्या बिबट्या मृतअसल्यचे दिसून आले. या बिबट्याचा कशामुळे मृत्यू झाला किंवा त्याची शिकार करण्यात आली, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

























































