पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी, शपथविधीआधी प्रदेशाध्यक्षांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष मदललाल सैनी लिहिलेल्या पत्रामध्ये हा उल्लेख आढळून आला आहे. पंतप्रधापदाच्या शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधीचे हे प्रकरण आहे. सैनी यांनी हे पत्र अशोक नगर पोलीस स्थानकामध्ये तपासासाठी दिले आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी याबाबत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या शपथविधीआधी एक दिवस त्यांचेकडे एक पत्र आले आहे. यात मोदींनी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हस्तलिखित या पत्रामध्ये राजेश टांक, छोटू आणि अन्य एकाच्या नावाचा उल्लेख होता. यानंतर सैनी यांनी याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे ते पत्रही त्यांच्याकडे तपासासाठी सोपवले. पोलिसांनी या पत्राबाबत तपास केला, परंतु पत्रामध्ये गंभीर असा मुद्दा नसल्याचे त्यांनी सांगितले. हा एका कटाचा भाग किंवा खोडसळपणा असावा अशी शक्यता पोलिसांना आहे. सध्या हे पत्र आयबीकडे सोपवण्यात आले आहे.