
आपण ज्या वस्तू दररोज वापरतो त्यापैकी अनेक वस्तू या परदेशात बॅन आहेत. परंतु हिंदुस्थानात त्या सर्रास विकल्या जातात.
रेड बुल एनर्जी ड्रिंक
अनेकांना रेड बुल ही एनर्जी ड्रिंक आवडते. परंतु फ्रान्स, डेन्मार्क सारख्या देशात 18 वर्षाखाली मुलांना रेड बुल पिण्यास बंदी आहे. रेड बुल मुळे हृदयाचे विकार, नैराश्य येते म्हणून अनेक देशांत रेड बुल वर बंदी आहे.
डिस्प्रिनची गोळी
आपल्याकडे अनेकांना डोकेदुखी झाली की लगेच डिस्प्रिन खाण्याची सवय आहे. पण डिस्प्रिन आरोग्यासाठी धोकादायक असल्याने अनेक देशात ती विकण्यास बंदी आहे.
पाश्चराईज्ड न केलेले दुध

हिंदुस्थानात थेट डेअरीतून दुध घेणे हे सामान्य गोष्ट आहे. पण परदेशात अशा प्रकारे दुध घेता येत नाही कारण ते पाश्चराईज्ड केलेले नसते. अमेरिका कॅनडा सारख्या देशात अशा दुधावर बंदी आहे.
किंडर चॉकलेट
लहान मुलांना किंडर चॉकलेट फार आवडतं. हे चॉकलेट अंड्याच्या आकारातील एका पॅकेटमध्ये येतं. हे चॉकलेट अनेक लहान मुलांच्या घशात अडकले म्हणून अमेरिकेत यावर बंदी आहे. पण हिदुस्थानात हे मोठ्या प्रमाणात विकले जाते.
लाईफ बॉय साबण
स्वच्छतेसाठी आपल्याकडे लाईफ बॉय साबण मोठ्या प्रमाणात वापरला जातो. परंतु परदेशात या साबणावर बंदी आहे. कारण या साबणामुळे त्वचा खराब होते असा दावा काही देशांनी केला आहे.





























































