नाभीत मळ साचलाय का ? ‘या’ सोप्या उपायांचा करा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाईघाईने आंघोळ केल्यामुळे बेंबीमध्ये बऱ्याचदा मळ साचतो. बेंबी किंवा नाभी हा पोटाचा अतिशय नाजूक भाग आहे. नाभीतली स्वच्छता नीट राखणे महत्त्वाचे असते असे न केल्यास नाभीमध्ये बॅक्टेरिया किंवा इन्फेक्शन होऊ शकते. बेंबी स्वच्छ न केल्यामुळे साबण, पाणी आणि कपड्यांतील घाणीमुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे नाभीतून दुर्गंधीही येऊ लागते. हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग असल्यामुळे साफसफाई करताना काळजी घ्यायला हवी.

बेंबीच्या स्वच्छतेकरिता एक कापसाचा गोळा घ्या, तो कोमट पाण्यात भिजवा. कोमट पाणी नाभीतील घाण सहज बाहेर काढते. हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता.

मुलतानी माती
मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यासाठी केला जातो तसेच नाभी साफ करण्यासाठी देखील करू शकता. मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नाभीवर आणि नाभीच्या आत लावा. थोडा वेळ राहू द्या, यानंतर नाभी स्वच्छ पाण्याने धुवा.

मिठाचा उपाय
कोमट पाण्यात मीठ मिसळा. मिठात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. जे बॅक्टेरियाशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. कापडाच्या मदतीने मिठाचे पाणी नाभीवर लावा. कोमट पाण्याने नाभी स्वच्छ केल्याने नाभीमध्ये असलेले बॅक्टेरिया आणि जंतू सहज नष्ट होतात.

कोरफड जेल
कोरफड जेलने आपण नाभी सहज स्वच्छ करू शकता. कोरफडीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे नाभी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी कोरफडीचे ताजे जेल नाभीवर लावा व काही वेळाने धुवा. नाभीचा काळेपणाही दूर होईल.