हिवाळ्यातील मेकअप अन् काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळा म्हणजे आल्हाददायक वातावरण. उबदार थंडीची मजा घेतानाच मेकअप करण्यासाठीही अतिशय सुखावह आणि योग्य वातावरण असल्यामुळे या दिवसांत थोडी काळजी घेऊन केलेला मेकअप जेवढा खुलतो, तेवढाच तो जास्त काळ टिकतोही. या दिवसांत शरीराला जास्त घाम येत नसल्यामुळे मेकअप खुलतो. आजकाल तर डेस्टिनेशन वेडिंगही या काळात बऱयाच मोठय़ा प्रमाणावर होतात. बाहेर फिरण्याची किंवा पिकनिकला जाण्याचीही हीच वेळ उत्तम. हिवाळय़ात मेकअप करताना काळजी मात्र चांगली घ्यावी लागते. कारण स्कीनवर मेकअप टिकत जरी असला तरी याच काळात थंडीमुळे आपली त्वचा जास्त प्रमाणात ड्राय होत असल्यामुळे त्याला भरपूर पाण्याची गरज भासते आणि ते पाणी आपण त्याला पुरवणं म्हणजेच एक प्रकारची त्वचेची सगळय़ात मोठी काळजी घेणं होय. थंडीमध्ये मेकअप करताना प्रथम सीटीएम (क्लिनझिंग, टोनिंग, मॉईश्चराईंझिंग) करूनच मेकअपला सुरुवात करावी लागते.

ड्राय स्कीनसाठी

  हिवाळय़ात ड्राय स्कीनला जास्त सीटीएमची गरज असते. कारण या काळातच स्कीन ड्राय असल्यामुळे ती फुटणे किंवा फाटणे, ओठांवरील स्कीन निघून जाणे असे नवनवीन प्रकार होत असतात.  त्यामुळे ड्राय स्कीनवर मेकअप करताना तुम्ही प्रथम चेहरा क्लीन करून, नंतर त्यावर मॉइश्चरायझर लावून जर बाहेर जाणार असाल तर सनक्रीन व टोनर लावा. टोनर सुकल्यानंतर त्यावर एक-दोन थेंब सिरमचा वापर करा आणि मग चांगल्या कंपनीचं स्कीनला सूट होईल असं  प्रायमर लावून थोडं सेट होऊ द्या. त्यामुळे चेहऱयावर एक प्रकारची शाइन येईल आणि मग त्यावर  टू इन वन फाउंडेशन किंवा जे फुल कव्हरेज देईल असं फाउंडेशन वापरून तुमच्या चेहऱयाला एकसंघ असा लूक द्या. त्यावर अगदी हलकीशी पावडर लावून, मग थोडा ग्लॉसी आयशॅडोचा वापर करून, आपल्याला आपल्या ड्रेसवर मॅचिंग किंवा आपल्याला आवडतील अशा प्रकारचे आयशॅडो करून, जेल आयलाइनरचा वापर करून, आवडेल त्या आकाराचे आयलाइनर लावा आणि नंतर त्यावर मस्काराला लावा.

ऑइली स्कीनसाठी…

 थंडीत ऑइली स्कीनचा मेकअप करताना हाय डेफिनेशन, फूल कव्हरेज मेकअप वापरल्यामुळे योग्य परिणाम साधू शकतो. तसेच हायलायटर वापरल्याने चेहऱयाला उठावदारपणा येतो. पावडरचा वापर मात्र कमी प्रमाणात करा. त्यानंतर नेहमीप्रमाणे आयशॅडो लावा. जर तुम्ही संध्याकाळच्या पार्टीसाठी बाहेर जाणार असाल तर मात्र ग्लिटर आयशॅडोचा वापर जरूर करू शकता. ग्लिटर आयशॅडोमुळे   तुमचे डोळे जास्त तजेलदार आणि सुबक दिसतील. आयलायनर ऑइली स्कीनसाठी जास्त आरामदायी असलं पाहिजे.   मॉइश्चरायझरचं प्रमाण असलेल्या चांगल्या कंपन्यांचे मस्कारा तुम्ही वापरू शकता. डोळय़ांचा मेकअप झाल्यानंतर ओठांवर कोणत्याही चांगल्या कंपनीचा किंवा अनेक आयुर्वेदिक कंपन्यांचा लिपबाम वापरून त्यावर लिपस्टिक लावा. लिपस्टिक वापरतानाही लिक्विड लिपस्टिकचा वापर करा.

 – शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट

[email protected]