सुपरस्टार मेस्सीची 35 वी विक्रमी ‘हॅटट्रीक’, रोनाल्डोला टाकले मागे

428

बार्सिलोनाचा स्टार लिओनेल मेस्सी याने “ला लिगा” या प्रतिष्ठेच्या यूओपिअन लीग स्पर्धेत आपली 35 वी विक्रमी हॅटट्रीक नोंदवत पोर्तुगालच्या सुपरस्टार रोनाल्डोला मागे टाकले. रोनाल्डो सध्या युवेंट्स क्लबचे प्रतिनिधित्व करतोय. मेस्सीच्या विक्रमी हॅटट्रीकच्या बळावर बार्सिलोनाने आपल्या होमग्राउंडवरील लढतीत आरसीटी मालोर्का क्लबला 5-2 असे सहज पराभूत केले. मेस्सीने लढतीच्या 17 व्या, 41 व्या आणि 83 व्या मिनिटाला गोल नोंदवत अफलातून हॅटट्रीक साकारली.

अर्जेंटीनाचा सुपरस्टार मेस्सी हा युरोपच्या टॉप 5 स्पर्धांत गेल्या 14 हंगामात 10 हुन अधिक गोल करणारा जगातला पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. याच महिन्यात 2 डिसेंबरला सहाव्यांदा “बॅलॉन डी ओर” ‘किताब पटकावत जगातला सर्वश्रेष्ठ फुटबॉलर हा किताबही मेस्सीने आपल्या नावावर केला आहे.

शनिवारच्या महत्वपूर्ण ला लिगा लढतीत मेस्सी व्यतिरिक्त बार्सिलोनाच्या एंटोइन ग्रिजमान ने 7 व्या आणि लुईस सुआरेज याने 43 व्या मिनिटाला गोल नोंदवत आपल्या संघाचा शानदार विजय निश्चित केला. पराभूत मालोर्काच्या वतीने दोन्ही गोल आंते बुदिमीरयाने35 व्या आणि 64 व्या मिनिटाला नोंदवले.

आपली प्रतिक्रिया द्या