
चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर देखील अवलंबून असते. सुंदर आणि गुलाबी ओठ कोणाला आवडत नाहीत? विशेषत: प्रत्येक स्त्रीला आपले ओठ आकर्षक असावेत असे वाटत असले, तरी काही चुकीच्या सवयींमुळे ओठ काळवंडू शकतात. यामुळे चारचौघात लाजीरवाणे देखील वाटते. ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही चुकीच्या सवयी कायमस्वरुपी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. पाहूया 5 चुकीच्या सवयी. ज्या सोडल्याने तुम्ही मुलायम आणि लालचुटुक औठांचे सौंदर्य वाढवू शकता.
मृत त्वचा
ओठांवर बऱ्याचदा मृत त्वचा असते. ती वेळीच काढून टाकणे गरजेचे असते. मृत त्वचा ओठांवर जमा झाल्याने ओठांवर सुरकुत्या पडतात. यामुळे ओठांच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी दररोज ओठांना मसाज करणे आणि त्यावर जमा झालेली मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन काढून टाकणे आवश्यक आहे.
लिपस्टिक
केमिकलयुक्त लिपस्टिक वापरल्याने ओठ काळे पडू शकतात. विशेषत: कमी दर्जाची लिपस्टिक वापरल्याने ओठ काळे पडण्याचे प्रमाण वाढते. यासाठी ज्यामध्ये नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला आहे अशी चांगल्या दर्जाची लिपस्टिक वापरणे आवश्यक आहे.
व्यसन
धूम्रपानामुळे ओठ काळे होऊ लागतात. जी व्यक्ति अति धूम्रपान करते तिला काळ्या ओठांच्या समस्येचा सामना करावा लागतो. याकरिता धू्म्रपान करणे टाळणे आवश्यक आहे.
पाणी कमी पिणे
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ओठ काळे पडतात किंवा ओठांच्या रंगात बदल झालेला जाणवू लागतो. यामुळे जास्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. हिवाळ्याच्या दिवसांत विशेषत: अति पाणी पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
एक्सपायर्ड लिप बामचा वापर
जर तुम्ही लिप बाम वापरत असाल तर ते एक्सपायर्ड झालेले नाही ना हे माहीत करून घेणे आवश्यक आहे. यामुळे ओठांचे सौंदर्य वाढण्याऐवजी ते काळे पडू शकतात.


























































