
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी येणार
- स्वागतासाठी जय्यत तयारी
- कार्यक्रमस्थळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन
- खासदार राजन विचारे यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत
- दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
- उपस्थित मान्यवरांचे स्वागत
- खासदार राजन विचारे यांच्या संबोधनाला सुरुवात
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
- आता आपण भाषण करायला आलेलो नसून भाषण करायला लवकरच ठाण्यात येणार
- तेव्हा राजकीय आरोग्याची काळजी घेणार
- राजकारणात विकृतपणा दिसत असून ही शिवसेना आजही विचारांपासून दूर गेलेली नाही
- 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण याच विचारसरणीवर शिवसेनेचे कार्स सुरू आहे.
- शिवसेना मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा अभिमान आहे.
- अस्सल निष्ठावंत शिवसैनिक येथे आहे, विकाऊ होते , ते गेले, ते काय भावाने गेले सर्वांना माहिती आहे.
- कश्मीरपर्यंत ही गोष्ट पसरली आहे, त्यात महाराष्ट्राची आणि शिवसेनेचीही बदनामी झाली आहे.
- महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरुणाखाली लांडगे घुसले होते, ते गेले आहेत
- आता आपल्यासोबत अस्सल निखाऱ्यासारखे शिवसैनिक आहेत.
- हे निखारेच उद्या धगधगतची मशाल पेटवणार आहेत.
- या आरोग्यशिबीरासाठी सर्व डॉक्टरांचे आभार
- आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
- कोरोनाकाळात डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांच्या रुपाने देव दिसला.
- राजकारणाच्या घाणीत पाऊल न टाकता समाजेसेवेचे काम करणारे खासदार राजन विचारे आणि शिवसैनिकांचे अभिनंदन

























































