#INDvWI – विंडीजचा 67 धावांनी धुव्वा, हिंदुस्थानने मालिका 2-1 अशी जिंकली

1352

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजमध्ये मुंबईतील वानखेडे मैदानावर निर्णायक सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा 67 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. याआधी पहिला सामना टीम इंडियाने तर दुसरा सामना वेस्ट इंडीजने जिंकला होता.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 241 धावांच्या पहाडाएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची तारांबळ उ़डाली. विंडीजचे सलामीचे तीन फलंदाज 20 धावांच्या आत बाद झाले. यानंतर पोलार्ड आणि हेटमायरने काही काळ आकर्षक फटकेबाजी करत सामना रंगदार स्थितीत आणला. परंतु हेटमायर (41) आणि पोलार्ड (68) बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव कोसळला. विंडीजला 20 षटकात 8 बाद 173 धावांच करता आल्या आणि हा सामना टीम इंडियाने 67 धावांनी जिंकला.

त्याआधी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात तीन बाद 240 धावा करत वेस्ट इंडीजपुढे 241 धावांचे आव्हान ठेवले. टीम इंडियाकडून रोहित शर्माने 71, लोकेश राहुलने 91 आणि विराट कोहलीने नाबाद 70 धावांची तुफानी खेळी केली.

Ind v Wi T20 Live update –

 • टीम इंडियाचा 67 धावांनी विजय
 • विंडीजच्या 20 षटकात 8 बाद 173 धावा
 • विंडीजला सातवा धक्का, वॉल्श बाद
 • विंडीजच्या 150 धावा पूर्ण
 • बाद होण्यापूर्वी 39 चेंडूत 68 धावांची खेळी केली
 • विस्फोटक पोलार्ड बाद, विंडीजला सहावा धक्का

 • 36 चेंडूत 117 धावांची आवश्यकता
 • 14 षटकानंतर 5 बाद 125 धावा
 • किरॉन पोलार्डचे अर्धशतक, विंडीजची झुंज
 • 12 षटकानंतर 5 बाद 105 धावा
 • जेसन होल्डर 8 धावांवर बाद
 • विंडीजचा निम्मा संघ माघारी, टीम इंडियाची सामन्यावर पकड
 • 11 षटकानंतर 4 बाद 103 धावा
 • विंडीजच्या 100 धावा पूर्ण
 • बाद होण्यापूर्वी केल्या 41 धावा
 • वेस्ट इंडीजला चौथा धक्का, धोकादायक हेटमायर बाद
 • 9 षटकानंतर विंडीजच्या 3 बाद 79 धावा
 • पोलार्ड – हेटमायरने डाव सावरला
 • 4 षटकानंतर विंडीजच्या 3 बाद 19 धावा
 • निकोलस पूरन शून्यावर माघारी
 • वेस्ट इंडीजचा डाव कोसळला, तीन खेळाडू झटपट बाद
 • शमीने 7 धावांवर केले बाद
 • वेस्ट इंडीजला दुसरा धक्का, सिमन्स बाद

 • दोन षटकानंतर विंडीजच्या 1 बाद 16 धावा
 • किंग 5 धावांवर बाद
 • वेस्ट इंडीजला पहिला धक्का

 • वेस्ट इंडीजचा ल्युईसच्या पायाला दुखापत झाल्याने तो रुग्णालयात दाखल, सामन्यात खेळण्याची शक्यता कमी

 • 20 षटकानंतर 3 बाद 240 धावा

 • के.एल. राहुल 91 धावांवर बाद
 • 19 षटकानंतर दोन बाद 231 धावा
 • 21 चेंडूत झळकावले अर्धशतक
 • विराटचे वादळी अर्धशतक
 • 18 षटकानंतर दोन बाद 204 धावा
 • 17.4 षटकात द्विशतक फलकावर
 • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
 • 17 षटकानंतर दोन बाद 187 धावा
 • 15 षटकानंतर दोन बाद 173 धावा
 • टीम इंडियाच्या 150 धावा पूर्ण
 • 13 षटकानंतर दोन बाद 142 धावा
 • रोहित पाठोपाठ पंत आल्या पावली माघारी
 • बाद होण्यापूर्वी केल्या 34 चेंडूत 71 धावा
 • रोहित शर्मा बाद, टीम इंडियाला पहिला धक्का

 • के.एल. राहुलचे अर्धशतक

 • 8 षटकानंतर बिनबाद 102 धावा
 • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
 • 23 चेंडूत झळकावले अर्धशतक
 • वानखेडेवर षटकारांचा पाऊस, रोहितचे अर्धशतक

 • 6 षटकानंतर बिनबाद 72 धावा
 • पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाची तुफान फटकेबाजी
 • 5 षटकानंतर बिनबाद 58 धावा
 • टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण

 • 1 षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 5 धावा
 • हिंदुस्थानची फलंदाजी सुरू, रोहित-राहुल मैदानात
 • संजू सॅमसनला तिसऱ्या लढतीतही संघात स्थान नाही

 • वानखेडेवर पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ 6 पैकी 5 लढतीत विजयी
 • वेस्ट इंडीजचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या