
सामना ऑनलाईन । नगर
राष्ट्रवादी काँग्रेसन प्रतिष्ठेच्या केलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातील शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. यासंबंधी त्यांचे वडील आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुजय विखे यांने घेतलेला भाजप प्रवेशाचा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकही गुन्हा दाखल नसलेल्या सुजय विखेंची संपत्ती कोटींच्या घरात
उमेदवारी अर्ज भरताना आई-वडील सोबत नसल्याने सुजय विखे भावूक झाले होते. परंतु आम्ही जरी त्याच्यासोबत नसलो तरी शिवसेना-भाजप महायुतीचे नेते त्याच्यासोबत आहेत. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, असे भावूक उद्गार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांची निवडणुकीतून माघार, सुजय विखेंना पाठींबा जाहीर
नगरची जागा राष्ट्रवादीने व्यक्तीगत केली
लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पवार आणि विखेंमध्ये नगरच्या जाग्यावरून संबंध ताणले गेले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला होता. अखेर पवारांनी विखेंसाठी जागा सोडणार नसल्याची आपली पूर्वीचीच भूमिका कायम ठेवल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा व्यक्तीगत केल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा केला.



























































