Lok Sabha Elections 2024: यवतमाळच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ

यवतमाळमधील पुसद येथे प्रचारसभा सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली आहे. कडक उन्हामुळे त्रास झाल्याने त्यांना भोवळ आल्याचं वृत्त आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नितिन गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. भोवळीमुळे त्यांचा तोल जाणार होता. मात्र, त्यांना स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी सावरलं. त्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना नेण्यात आलं आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या प्रचाराच्या धामधुमीमुळे गडकरी यांना भोवळ आल्याची माहिती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)