Lok Sabha 2019 उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी 20 पेक्षा जास्त सभा घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi-red-fort

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदारसंघ असून इथल्या यशावर भाजपची केंद्रात सत्ता पुन्हा बनू शकेल किंवा नाही हे ठरणार आहे. या निर्णायक राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किमान 20 सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 5 वर्ष ज्या भागात गेले नव्हते त्या भागातही ते विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत. यामध्ये गोरखपूर, गाजियाबाद, कानपूर, झांसी, अलाहाबाद, मिर्झापूर, अमेठी या मतदारसंघाचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेशातल 7 टप्प्यांमध्ये मतदार होणार आहे. 11 एप्रिल ते 11 मे 2019 दरम्यान या राज्यात मतदान घेतलं जाणार आहे.   नरेंद्र मोदी यांनी ज्या भागात जायचं ठरवलं आहे त्या भागात गेल्यानंतर त्याच्या आसपासच्या मतदारसंघांवरही त्याचा परिणाम होणार आहे. भाजपने बारकाईने मोदींचा उत्तर प्रदेश दौरा निश्चित केला आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात 39,000 किलोमीटरचा दौरा केला होता आणि 79 बैठका घेतला होता. या बैठका आणि सभांचा भाजपला चांगला फायदा झाला होता. भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 73 मतदारसंघात विजय मिळवला होता.