लव्ह जिहाद : हिंदू मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

गोकुंदा ता.किनवट येथे एका अल्पवयीन मुलीवर 2016 मध्ये अत्याचार करणाऱ्या मुस्लिम नराधमास तिसरे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश के.एन.गौतम यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 6,500 रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने 5 जून 2016 रोजी तक्रार दिली की, ती आपल्या आई आणि भावासोबत फकीर खान हुसेन खान पठाण यांच्या घरात भाड्याने राहत होते. 5 जून रोजी तिची आई आणि भाऊ हे नेहमीच प्रमाणे आपल्या दुकानावर गेले. त्यानंतर सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरमालकाचा एक नातलग मुलगा सय्यद अफरोज सय्यद मुर्तुजा घरात आला. मुलीने त्याला घरात का आलास याची विचारणा केली तेंव्हा त्याने तिच्या तोंडावर एक रुमाल टाकला आणि तिच्यावर अत्याचार केला. आई घरी आली तेव्हा तिने मुलगी बेशुद्ध होती. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने घडलेली हकीकत सांगितल्यानंतर आई आणि मुलीने जावून किनवट पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दिली.

किनवट पोलिसांनी या प्रकरणी कलम 376, 452, 323 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी यांच्याकडे देण्यात आला. पोलीसांनी तपास करून सय्यद अफरोज सय्यद मुर्तुजा (26) यास पकडले. यानंतर त्याला जामिनही मिळाला. जवळपास तीन वर्ष चाललेल्या या खट्यामध्ये एकून 10 साक्षीदार सरकारपक्षाने तपासले. वैद्यकीय अहवालात या मुलीच्या शरिरावर चार ते पाच ठिकाणी जखमा आल्या होत्या. उपलब्ध पुराव्या आधारे न्या. गौतम यांनी सय्यद अफरोजला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड, कलम 451 प्रमाणे 5 वर्षे सक्तमजुरी व 1 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 323 प्रमाणे 500 रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या सर्व शिक्षा सय्यद अफरोजला एकत्रित भोगायच्या आहेत. या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. संजय लाठकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.