यू-डायस नोंदणीकडे शाळांचे दुर्लक्ष, 13 मेपर्यंत केवळ 56 टक्के नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी सुट्टीमुळे राज्यातील शाळांच्या यू-डायस नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाला आहे. सुट्टीमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत नसल्याने नोंदणीकडे शाळांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. 13 मेपर्यंत केवळ 56 टक्के शाळांची नोंद झाली असून येत्या चार दिवसांत म्हणजेच 31 मेपर्यंत शाळांनी नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश राज्य प्रकल्प संचालकांनी दिले आहेत.

पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसच्या माध्यमातून मिळवली जाते. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधांची माहिती, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, शिक्षक संख्या आणि पदे, रिक्त पदे आदी माहिती या माध्यमातून दरवर्षी एकत्रित केले जाते.  केंद्र सरकारच्या वतीने यू-डायस प्लस ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सर्व शाळांना 30 मेपूर्वी सर्व माहिती ऑनलाइन भरण्याचे आदेश 13 एप्रिल रोजी देण्यात आले होते. राज्यात हे काम दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत चालते. कोरोनामुळे हे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. शैक्षणिक वर्ष संपत असताना यंदा माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले. मे महिन्याची सुट्टी आणि शाळा बंद यामुळे यंदा माहिती भरण्याचे काम रेंगाळले आहे.

  • गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार 9 जिह्यांमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर एकूण नोंदणी प्रमाण 60 पेक्षा कमी आहे.
  •  यू-डायस प्लसमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणीचे प्रमाण दोन टक्के कमी झालेले आहे.
  • माध्यमिक स्तरावरीत 19 जिह्यांमध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे.
  • 9 टक्के शाळा या एक शिक्षक आहे, 8 हजार 255 शाळांमध्ये 15 पेक्षा कमी पटसंख्या आहे.
  • माध्यमिक स्तरावरील 20 जिह्यांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे नोंदविले आहे.
  • 8.3 टक्के उच्च प्राथमिक शाळांमध्ये 3 विषय शिक्षक आरटीईनुसार नमूद आहे.
  • शासकीय शाळांमध्ये मुलांकरिता स्वच्छतागृह, मुलींसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी सुविधा, रॅम्प सुविधा, इलेक्ट्रॉनिक सुविधा, खेळाचे मैदान, ग्रंथालय याबाबतची माहिती नमूद नसल्याचे भारत सरकारकडून कळविण्यात आले आहे.
  •  यामुळे 30 मे, 2022 पर्यंत तातडीने सादर करावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत.