शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, आंदोलनस्थळीच बांधली लग्नगाठ! मध्य प्रदेशातील दांपत्याचा आगळा फंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वाढदिवस असो की विवाह, आम्ही शेतकरी केंद्र सरकारने जुलमी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलनस्थळ सोडणार नाही’, असा कडक संदेश सरकारला देण्यासाठी मध्य प्रदेशातील रेवाच्या एका नवदांपत्याने आपल्या विवाहाची गाठ चक्क रेवातील शेतकरी आंदोलनाला बसलेल्या ठिकाणीच बांधली.

गुरुवारी किसान आंदोलन स्थळावर या दांपत्याचे शुभमंगल पार पडले. या आगळ्या विवाहसोहळ्याचे शेतकरी आंदोलकांनाही मोठे अप्रूप होते. त्यांनी नवदांपत्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या पद्धतीवर स्तुतिसुमने उधळली.

मध्य प्रदेशातील शेतकरी यंदा 3 जानेवारीपासून रेवा येथे मोठय़ा संख्येने केंद्राने अन्याय कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी आंदोलनास बसले आहेत. मध्य प्रदेश किसान संघटनेशी संलग्न असलेले रामजीत सिंग यांचा मुलगा सचिन सिंग याने आपला विवाहसोहळाच आंदोलनस्थळी आयोजित केला. गुरुवारी आंदोलक शेतकरी वऱहाडी बनले. त्यांनी सचिन आणि त्याच्याशी विवाह करणाऱया नववधूला शुभाशीर्वाद दिले. या आगळ्या लग्नसोहळ्याची पूर्ण मध्य प्रदेशात चर्चा होती.