
आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसणार आहे. विधानसभा निवडणुकीवरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच टाइम्स नाऊ आणि नवभारतने ओपिनियन पोल जारी केले आहेत. या नव्या ओपिनियन पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार आहे असे म्हटले आहे. मध्य प्रदेशात आज विधानसभा निवडणुका झाल्यास भाजपला 102 ते 110 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस पक्षाला 118 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे.
























































