रुद्राक्षासाठी चेंगराचेंगरी, मालेगावची महिला ठार; बुलढाण्याच्या महिलेसह तिघीजणी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर येथील कुबेरेश्वर धाममधील रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी होऊन मालेगाव येथील मंगलबाई ही महिला ठार झाली, तर बुलढाण्याच्या एका महिलेसह तिघीजणी बेपत्ता झाल्याची दुर्घटना आज घडली.

कुबेरेश्वर धाममध्ये आज पाच लाख रुद्राक्षे वाटण्यात आली; मात्र तेथे दहा लाख भाविक उपस्थित होते. त्यामुळे रुद्राक्षासाठी चेंगराचेंगरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रदीप मिश्रा यांनी कथा सांगताना, मृत्यू येणार असेल तर टळणार नाही. तो येणारच असे वक्तव्य केले. शिवाय येथे यायचे तर महादेवसाठी या, रुद्राक्षासाठी नको, असे आवाहन भक्तांना केले. दरम्यान, रुद्राक्ष न मिळालेले लोक पंडित मिश्रांविरोधात नारेबाजी करत माघारी जात होते.