महाड ट्रॉमा केअर सेंटरला खासगी डॉक्टरांचे ‘बुस्टर’

695

चार वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली नसल्याने व्हेंटीलेटरवर गेलेल्या महाड ट्रामा केअर सेंटरला आता खासगी डॉक्टरांचे ‘बुस्टर’ मिळणार आहे. शासकीय वैद्यकीय अधिकाऱयांची कायमस्वरूपी भरती होईपर्यंत खासगी तज्ञ डॉक्टरांकडून मानधन तत्त्वावर ट्रामा केअर सेंटरवर नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये घडणाऱया अपघातात जीव कंठाशी आलेल्या रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून त्यांचे प्राण वाचणार आहेत.

– एक सर्जन, चार एमबीबीएस डॉक्टर, एक भूलतज्ञ, एक अस्थिरोग तज्ञ, एक स्त्राrरोग तज्ञ, एक बालरोग तज्ञ अशा नउै वैद्यकीय अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली होती.
– डॉ. दीपक अडकमोल हे एक वैद्यकीय अधिकारी वगळता उर्वरित सर्व उच्चशिक्षित डॉक्टरांनी ग्रामीण भागात काम करण्यास सक्त मनाई केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग, औद्योगिक वसाहत आणि ग्रामीण भागातील अपघात यांसह विविध आजारांवर तातडीने उपचार करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने 2009 मध्ये नवेनगर भागातील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ट्रामा केअर सेंटर सुरू केले. अत्याधुनिक साधनसामग्रीने युक्त असे हे ट्रामा केअर सेंटर आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून मान्यता देण्यात आलेल्या नउै वैद्यकीय अधिकाऱयांपैकी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करताना येथील रुग्णसेवेवर ताण येत असून अनेक वेळा अत्यवस्थ रुग्णांना इतरत्र हलवण्याची नामुष्की ओढावते, तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाची इमारत नादुरुस्त असल्याने येथील सर्व आरोग्य यंत्रणा ट्रामा केअरमध्ये हलवण्यात आली आहे.

रिक्त पदांची लवकरच भरती
ट्रामा केअर केंद्रामध्ये अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी महाड शहरातील दहा खासगी वैद्यकीय तज्ञ नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले एमबीबीएस डॉक्टरही आठवडय़ातून तीन दिवस येथे हजेरी लावणार आहेत. हा तात्पुरती उपाय असून लवकरच कायमस्वरुपी वैद्यकीय तज्ञांची नेमणूक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या