
सीमाप्रश्न, महागाई, बरोजगारी, महापहरूषांच्या आवमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत काढण्यात येणाऱया महामोर्चात हजारो सीमा बांधव सहभागी होणार आहे. त्यासाठी बेळगाव, निपाणी, कारवार, खानापूर, भालकी, मक्करसह आजूबाजूच्या भागातील सीमा बांधव मोठय़ा संख्येने आज मुंबईल दाखल झाले आहेत. तसेच या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी या महामोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती बेळगाव सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो शिवसैनिक येणार
मोर्चाला रत्नागिरी जिह्यातून शेकडो शिवसैनिक येणार आहेत. सध्या जिह्यात मोठय़ा संख्येने ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. 18 डिसेंबरला मतदान आहे. तरीही आम्ही ग्रामपंचायतींचे नियोजन करून मोर्चात सहभागी होणार आहोत. अनेक शिवसैनिक स्वच्छेने हजर राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधूनही शिवसैनिक मार्गस्थ
मुंबईत काढण्यात येणाऱया मोर्चासाठी हजारो शिवसैनिक जातील, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सुनील बागुल यांनी दिली. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी नाशिक जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. नाशिक शहर आणि जिह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले.
मी मोर्चाला नसेन, पण माझा पाठिंबा – अशोक चव्हाण
महाविकास आघाडीच्या उद्या 17 नोव्हेंबर रोजी होणाऱया मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र नांदेड येथे माझ्या निकटवर्तीय कुटुंबातील पूर्वनियोजित विवाह सोहळा असल्याने मला मोर्चात सहभागी होणे शक्य नसल्याचे ट्विट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. आपण या मोर्चात सहभागी होणार नसलो तरी माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असे चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


























































