
महाराष्ट्र रिक्षा चालक सेना ही शिवसेनेची अधिकृत संघटना आहे. महाराष्ट्रात 1985 पासून ती कार्यरत असून आमदार अॅड. अनिल परब हे सादर युनियनचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सामना’ वृत्तपत्रात शिवसेनेच्या अंगीकृत संघटना जाहीर झाल्या होत्या. त्यात अनावधानाने महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे नाव नमूद करण्याचे राहून गेले होते, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले आहे.