
महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा टीझर सोमवारी लाँच झाला. चित्रपटात ज्योतिरावांच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसतील.
संभाजी ब्रिगेड- भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सत्यशोधक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ चा टीझर लाँच झाला. चित्रपटात राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी आदी कलाकार आहेत.