
शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी महावितरणने केवळ 7 दिवसांत 7867 नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलले आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱयांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी पाठपुरावा करून अधिकारी व कर्मचाऱयांच्या टीम वर्कच्या आधारे राज्यातील 7867 नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बदलण्याचे काम पूर्ण केले. एका विशेष कृती आराखडय़ाच्या अंतर्गत नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलण्याची मोहीम राबविण्यात आली. 29 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यात नादुरुस्त असलेल्या एकूण 6098 वितरण रोहित्रांपैकी 7 डिसेंबर 2022 पर्यंत 5917 वितरण रोहित्रे बदलण्यात आली आहेत. याशिवाय 29 नोव्हेंबर 2022 नंतर नादुरुस्त झालेल्या रोहित्रांपैकी 1950 रोहित्रेही महावितरणतर्फे बदलण्यात आलेली आहेत. इतक्या कमी कालावधीत मोठय़ा प्रमाणावर नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे.




























































