
माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री त्यांना पुण्याच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांना गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवू लागली त्यांनी तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
गुरुवारी मध्यरात्री त्यांना पुण्याच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान त्यांनी मतदार संघातील जनतेला आवाहन केले आहे. आपली अन् आपल्या कुटूंबाची काळजी घ्या, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असा संदेश त्यांनी दिला आहे.

























































