पाकिस्तानची अवस्था बिकट; काही तासांपासून इस्लामाबादसह अनेक बड्या शहरात वीज नाही

पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पाकिस्तानात महागाईने टोक गाठलं आहे, पोटापाण्याचे हाल आहेत. अशातच आता विजेचा पुरवठा खंडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण भागांमध्ये अनेक तासांपासून वीज नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7:34 वाजता नॅशनल ग्रीडची सिस्टीम फ्रिक्वेन्सी कमी झाली, ज्यामुळे वीज यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड झाला. या यंत्राच्या देखभालीचे काम वेगाने सुरू आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे.