अवकाळी नुकसानग्रस्तांना पंचनामे करून भरपाई द्या – युवा सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लोणावळा

मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत कार्ला मंडलाधिकारी साबळे यांना युवा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दि.५ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले. भात कापणी करून शेतक-यांनी शेतात ठेवलेले भातपीक भिजले असून, वर्षभर शेतात केलेले कष्ट वाया गेले आहेत, तसेच ज्या शेतक-यांनी झोडणी केली व जनावरांसाठी पेंढा रचून ठेवला तो संपूर्ण पेंढा या अवकाळी पाऊसाने भिजुन गेल्याने भविष्यात चा-याचा प्रश्नही उदभावणार आहे,या संदर्भात शासनाने ताबडतोब अशा भातपिकाची व चा-याची पाहणी करून तातडीने पंचनामा करून शेतक-यांना तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी युवासेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, भारतीय विद्यार्थी सेना वाकसई गण संघटक नितिन देशमुख, शुभम गायकवाड, शिलाटणे मा. शाखाप्रमुख हिंदुराज कोंडभर, अक्षय हुलावळे, बंटी हुलावळे, दहिवली युवा सेना शाखा अधिकारी शुभम मावकर, आदित्य हुलावळे, आदेश हुलावळे, अमोल इंगवले, गिरीश हुलावळे, प्रतिक हुलावळे, सौरभ हुलावळे उपस्थित होते.