झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणास मलेशियाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
zakir-naik

सामना ऑनलाईन । क्वालालंपूर

वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू व दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य पोहोचवणारा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक याला मलेशिया हिंदुस्थानकडे सोपवणार नसल्याचे मलेशियाचे पंतप्रधान महातीर बिन मोहम्मद यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे झाकीर नाईक हिंदुस्थानात परतणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याला मलेशियात अटक करण्यात आली असून मलेशिया सरकार त्याला हिंदुस्थानकडे सोपविणार असल्याची चर्चा सध्या रंगली होती. मात्र मलेशियाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे सांगितले आहे. झाकीर नाईकला आम्ही मलेशियाचे नागरिकत्त्व दिलेले आहे. त्यामुळे आम्ही त्याला हिंदुस्थानकडे सोपविणार नसल्याचे सांगितले आहे