याला म्हणतात खरं प्रेम! 1400 किमी दूर असलेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पठ्ठ्या पायी निघाला, ‘व्हॅलेंटाईन डे’ला करणार…

प्रेमात वेडे झालेले प्रियकर आणि प्रेयसी कोणत्या थराला जातील याचा काही भरवसा नाही. सध्या अशाच एका प्रेमविराचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तो प्रेयसीला भेटण्यासाठी 1400 किलोमीटर पायी प्रवास करत असल्याचा दावा करतोय. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी आपण पायी निघाल्याचे त्याने म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती थायलंड येथील रहिवासी आहे. पाच महिन्यांपूर्वी टिकटॉकवर त्याची ओळख एका तरुणीशी झाली होती आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आता तिला प्रपोज करण्यासाठी हा पठ्ठ्या घरातून निघाला असून तब्बल 1400 किलोमीटर प्रवास करून तो प्रेयसीजवळ पोहोचणार आहे. 14 जानेवारीलाच त्याने आपला हा प्रवास सुरू केला असून व्हिडीओच्या माध्यमातून तो सतत अपडेट्स लोकांसोबत शेअर करतोय.

सदर व्यक्ती थायलंडच्या नाखोन नायोक (Nakhon Nayok) प्रातंतील असून तो सातुन (Satun) प्रांतात जाणार आहे. येथे त्याची प्रेयसी राहते. विशेष म्हणजे दोघे अद्याप एकदाही भेटलेले नसून टिकटॉकवरील ओळखीनंतर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात आहेत.

आपल्या या वेड्या प्रेमाबद्दल सांगताना सदर व्यक्ती म्हणाला की, 14 किंवा 15 फ्रेब्रुवारीपर्यंत प्रेयसीच्या घरी पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी सुमारे 1400 किलोमीटर पायी प्रवास करणार आहे. घरापासून सातुनपर्यंत पायी किंवा धावत पोहोचण्याचे आव्हान आपल्याला प्रेयसीनेच दिल्याचे त्याने सांगितले. आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी हे आव्हान स्वीकारल्याचेही तो म्हणाला.

टिकटॉक (@kaocivid1970) वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, पाच महिन्यांपूर्वी मी तिला टिकटॉकवर भेटलो. आम्ही प्रत्यक्ष आयुष्यात एकदाही भेटलोलो नाही, पण व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात आहोत. अलीकडेच तिने मला आव्हान दिले की सातून पर्यंत चालत किंवा धावत ये आणि प्रेम सिद्ध कर. मी हे आव्हान स्वीकारले आणि तिच्या घराकडे निघालो.