
आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने लहान मुलाचा खून करून त्याच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोपीला अटक केली आहे.
आंध्र प्रदेशच्या गुटुंर जिल्ह्यात 14 मार्च रोजी 6 वर्षाचा मुलगा हरवला होता. दोन दिवसांनंतर एका पेरुच्या बागेत या मुलाचा मृतदेह आढळला. जबर मारहाणीत या मुलाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पण्ण झाले.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून गोपीला अटक केली. गोपीने या लहान मुलाला पेरुच्या बागेत आणले आणि त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलगा जोरजोराने रडू लागला तेव्हा गोपीने लहान मुलाचे हात आणि पाय तोडले. तसेच गळा दाबून त्याचा खून केला.
लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गोपीने त्याच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर महिन्याभरापूर्वी एका आठ वर्षीय लहान मुलासोबत अशाच प्रकारे कृत्य करून त्याला ठार केले होते अशी कबुलीही त्याने दिली. पोलिसांनी या प्रकरणी गोपीविरोधात पोस्को अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.




























































