शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगढमध्ये एका प्रेयसीने प्रियकरासोबत सेक्सला नकार दिल्याने प्रियकराने तिची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. त्याआधी प्रियकराने प्रेयसीच्या घरच्यांना भुलवून दारू पाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र या 29 वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे.

सुरेंद्र याचे तो राहत असलेल्या थोथाझारिया गावातील एका 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे एकमेकांसोबत शारीरिक संबंध देखील होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरेंद्रची प्रेयसी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. त्यामुळे सुरेंद्र तिच्यावर चिडला होता. 1 जुलै रोजी सुरेंद्र तिच्या घरी गेला. सोबत जाताना तो कोल्ड्रिंक देखील घेऊन गेला होता. प्रेयसीच्या वडिलांसोबत त्याची चांगली ओळख होती. त्यामुळे त्याने गेल्या गेल्या तिच्या वडिलांना व आजीला कोल्ड्रिंक प्यायला दिले. त्या कोल्डड्रिंकमध्ये त्याने दारू मिसळलेली होती. त्यामुळे काही वेळातच प्रेयसीचे वडिल व आजी झोपून गेले. त्या संधीचा फायदा घेत त्याने प्रेयसीवर शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव आणला मात्र तिने नकार दिल्याने त्याने धारदार सुऱ्याने तिची हत्या केली. त्यानंतर तो तेथून पळून गेला.

प्रेयसीचे वडिल शुद्धीत आल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार कळला. त्यांनी या प्रकरणी सुरेंद्र विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रच्या एका नातेवाईकाच्या घरून त्याच्या मुसक्या आवळल्या. अटक झाल्यानंतर सुरेंद्रने चौकशी दरम्यान हत्येचे कारण सांगितले.