नशीब असावं तर असं… मागवलं अॅप्पल, मिळाला आयफोन

फोटो प्रातिनिधीक

‘देव जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो’ ही म्हण तंतोतंत खरी ठरलीय ती यूकेतील निक जेम्स यांच्या बाबतीत. ऑनलाइन एखादी वस्तू मागवल्यावर अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. परंतु निक यांच्या बाबतीत भलतेच घडले आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यावर त्यांना चक्क ऍपलऐवजी आयफोन मिळाला.

निक जेम्स यांनी टेस्को ग्रोसरी शॉपमधून ऑनलाइन सफरचंद मागवले होते. त्यांनी दिलेल्या ऑनलाइन ऑर्डरची डिलिव्हरी मिळाली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांना ऑर्डरमध्ये ऍपल तर मिळाले, पण त्यासोबतच ‘ऍपल’चा आयफोनसुद्धा मिळाला आहे. सुरुवातीला आपल्यावर कुणीतरी प्रॅंक करतेय असे त्यांना वाटले. खरं तर हा या शॉपच्या प्रमोशन कॅम्पेनचा एक भाग होता. टेस्कोमार्फत सुपर सबसिटय़ुट ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये भाग्यवान ग्राहकांना महागडय़ा इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्री म्हणून दिल्या जात आहेत. ज्यामध्ये निक भाग्यवान विजेता ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या