पादचाऱ्यासह ज्येष्ठ रिक्षाचालकाचा मोबाइल हिसकाविला, दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस कायम आहे. पादचारी, महिलांसह कामगारांना लक्ष्य करून मोबाइल हिसकाविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वारस्वार चोरट्यांनी मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 28 मे रोजी सकाळी सातच्या सुमारास काशेवाडीतील त्रिकोणी गार्डन कॉर्नरजवळ घडली. गोकुळदास आंबले (वय 33 रा. खडकवासला) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळदास 28 मे रोजी सकाळीकाशेवाडीतील त्रिकोणी गार्डन कॉर्नरजवळून रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून 10 हजारांचा मोबाइल आणि 500 रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत रिक्षात बसलेल्या जेष्ठ चालकाच्या हातातून तीन हजारांचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 28 मे रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास खडकीतील शेतकी महाविद्यालयानजीक घडली. याप्रकरणी जेष्ठाने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करीत आहेत.