शिवरायांचा अपमान करणाऱ्या, औरंगजेबला साहेब बोलणाऱ्याला शिवप्रेमींनी चोपले, संभाजीराजेंचाही फुल्ल सपोर्ट

7474

सोशल मीडियावर सतत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या, आणि औरंगजेबास साहेब बोलणाऱ्या एका व्यक्तीला शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेब मोठा होता, असे विधान हा व्यक्ती सतत करत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि त्यांच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह लिहिणाऱ्या व्यक्तीला शिवप्रेमींनी शुक्रवारी चोप दिला. याचा व्हिडीओ देखील लाईव्ह केला आणि त्याला माफीही मागायला लावली.

शिवप्रेमींनी चोप दिलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र राऊत असे आहे. हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या सोशल मीडिया माध्यम फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होता. शिवरायांचा खालच्या भाषेत उल्लेख करत होता आणि औरंगजेबाचा उदोउदो करत होता. शिवप्रेमींनी त्याला समजावून सांगितले असता तो चिथावणीखोर विधान करत होता. अखेर शिवप्रेमींचा संयम सुटला आणि त्याला चोप दिला.

जितेंद्र राऊत याच्याशी काही शिवप्रेमींनी संपर्क साधत असे लिखाण बंद करण्याची विनंती केली होती मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि सतत शिवरायांचा अपमान करत होता. यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शुक्रवारी त्याला पकडला आणि चोप दिला. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासत आणि गळ्यात चपलांचा हार घालून त्याचा सत्कारही केला. एवढेच नाही तर त्याला संपूर्ण महाराष्ट्र, छत्रपती घराणे आणि शिवप्रेमींची माफीही मागण्यास लावली. यानंतर त्याला पोलीस स्थानकात नेण्यात आले आणि कारवाईची मागणी करण्यात आली. हा सर्व प्रकार त्या व्यक्तिच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात आला, जेणेकरून अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवरायांबाबत बोलताना पुढे प्रत्येक व्यक्ती 10 वेळा विचार करेन.

screenshot_2020-03-20-14-42-11-034_com-facebook-katana

छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा फुल्ल सपोर्ट!
विमानातून बाहेर आलो आणि मोबाईलमध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही, अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन.

screenshot_2020-03-20-14-45-54-393_com-facebook-katana

आपली प्रतिक्रिया द्या