मराठा आरक्षण: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणारे 9 मराठा आंदोलक अटकेत

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत मार्ग रोखून धरणाऱ्या मराठा आंदोलकांपैकी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी टायर जाळून मार्ग रोखून धरला होता. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 10 मराठा आंदोलकांच्या विरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.