मराठा आरक्षणासाठी नायगांवमध्ये चक्का जाम, आंदोलकांनी घुंगराळा येथे रूग्णावाहीका फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकार चाळीस दिवसानंतरही मराठा समजाला आरक्षण देऊ शकले नाही म्हणून जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पांठीबा म्हणून नायगांव तालुक्यात विविध महामार्गावर चक्का जाम तर आंदोलकांनी घुंगराळा येथे रूग्णावाहीका फोडली तर नायगांव पंचायत समीतीचे शासकीय वाहन जाळण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला असून  पुर्ण ठप्प झाली आहे.

राज्यसकार मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आसल्याने. चाळीस दिवसानंतर ही कुठलीच हालचाल सरकारची दिसत नसल्याने जरांगे पाटील यांनी आंतरवली येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात केली असून त्याना पांठीबा म्हणून नायगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन 31 ऑक्टोबर च्या सकाळापासूनच तीव्र करण्यास सुरूवात केली आहे.

नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील काहाळा, बरबडा फाटा , कुष्णूर, घुंगराळा, पळसगांव फाटा देगांव फाटा, नायगांव, गडगा आदी भागात सकाळापासूनच रोडवर टायर जाळत घोषणा बाजी करत आंदोलन तीव्र केले आहे. पुर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. घुंगराळा येथे आंदोलकांनी रूग्ण वाहीकेची तोडफोड केली. तर नायगांव पंचायत समितीचे शासकीय वाहण 30 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री मराठा आंदोलकांनी वाहण जाळण्यात आले आहे.