सीमा भागातील मराठी बांधवांना त्रास देऊ नका! आदित्य ठाकरे यांची काँग्रेस सरकारला विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या मुख्यमंत्री नालेसफाईची पाहणी करीत असले तरी महाराष्ट्रात चिखल करून ठेवलाय त्याचे काय? पावसाळय़ाच्या तोंडावर मुंबईतील कामे अपूर्ण असल्यामुळे सरकारला कारभार जमत नाही.

कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या माध्यमातून नवी सुरुवात होत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये नव्या नात्याचीही सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केली. सीमा भागातील मराठी बांधवांना त्रास देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी नव्या काँग्रेस सरकारला केली.

कर्नाटकात आज काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नव्या सरकारबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दोघांनाही शुभेच्छा देताना त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांचा आता छळ होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, ‘सीमा प्रश्न’ चांगल्या मार्गाने सुटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.