
सामना प्रतिनिधी । नागपूर
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीदरम्यान होणाया 92 व्या अ़.भा़. मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेखा जाहीर करण्यात आली असून, संमेलनाच्या इतिहासात प्रथमच नियोजित संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत हा आराखडा तयार करण्यात आल्याचे मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ़. श्रीपाद जोशी यांनी पत्रपरिषदेत सांगितले़. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री अरुण ढेरे यांची निवड झाली आहे़.
या संमेलनात चार परिसंवाद, एक टॉक शो, एक चर्चा, एक कवी संमेलन, मान्यवर कवींचे कविता वाचन, एका मान्यवर लेखिकेची प्रकट मुलाखत, मान्यवर लेखकाचा व प्रकाश विश्वसंबद्ध घटकांपैकी एका मान्यवराचा सत्कार असा संमेलनाचा आराखडा आहे़. उद्घाटनानंतर संमेलनाची सुरुवात ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का’ या परिसंवादाने होणार असल्याचेही जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले़. शिवाय, ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची’ या विषयावर टॉक शो असणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले़. संमेलनात वऱ्हाडी बोलीतील स्वतंत्र कवीसंमेलन आणि यवतमाळ जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणारा आदिम जमातीतील तांड्यांच्या आणि पोडांच्या कथा-व्यथा मांडल्या जाणार असल्याचेही जोशी यावेळी म्हणाले़. कवीकट्ट्यासह ग्रंथप्रदर्शनात तिन्ही दिवस ज्या लेखकांना आपल्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ‘प्रकाशन व्यासपीठ’ खुले असणार आहे़. तसेच मराठीच्या उपयोजनाची विविध क्षेत्र समजावून सांगणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले़. याप्रसंगी डॉ़ इंद्रजित ओरके, डॉ़ विलास देशपांडे उपस्थित होते़.

































































