विकेंडला माथेरानच्या राणीच्या फेऱयांमध्ये वाढ, शनिवारी आणि रविवार आठ फेऱया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात ते आठ महिन्यांनी पुन्हा 4 नोव्हेंबरपासून आबालवृद्धांच्या सेवेसाठी सुरू झालेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनच्या आता उद्या 14 नोव्हेंबरपासून शनिवारी आणि रविवारी वीकेंडला आणखी चार अशा एपूण आठ फेऱया चालविण्यात येणार आहेत. एरव्ही अमन लॉज ते माथेरान अशा चार शटल फेऱया चालविण्यात येत आहेत.

 सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले पुन्हा माथेरानला वळत असून त्यासाठी वीकेंडला पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. 4 नोव्हेंबरपासून माथेरानच्या राणीच्या अमन लॉज (दस्तुरी नाका) ते माथेरान अशा दिवसाला चार शटल फेऱया सुरू केल्या आहेत. त्यास पर्यटकांसह माथेरानच्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता शनिवार आणि रविवारी अमन लॉज-माथेरान आणखी 4 शटल सेवा चालविण्यात येणार आहेत.

अतिरिक्त फेऱया या शनिवार आणि रविवार या दिवशी चालतील

माथेरान येथून प्रस्थान स. 10.20 वा. अमन लॉज येथे आगमन स. 10.38 वा.

अमन लॉज येथून प्रस्थान स. 10.45 वा. माथेरान येथे आगमन स. 11.03 वा.

माथेरान येथून प्रस्थान दु. 3.10 वा. अमन लॉज येथे आगमन दु. 3.28 वा.

अमन लॉज येथून प्रस्थान दु. 3.35 वा. माथेरान येथे आगमन दु. 3.53 वा.