Mumbai Mega Block मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रित काणए करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तसेच हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊ मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.

मध्य रेल्वे

माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 तेच दुपारी 3.55 या काळात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर 14 तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी अप आणि डाऊन मार्गावर 14 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे ते गोरेगाव शनिवारी 23.55 ते रविवारी 13.55 वाजेपर्यंत आणि शनिवारी रोजी 23.33 वाजेपासून गोरेगाव ते वांद्रे रविवारी रोजी 14.05 पर्यंत पर्यंत अप हार्बर मार्गावरील रद्द राहतील.

उपनगरीय ट्रेन धावण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल – 

• गोरेगावसाठी शेवटची लोकल GN 83 गोरेगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस येथून 22.54 वाजता सुटेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस शेवटची लोकल GN 86 असेल जी गोरेगावहून येथून 23.06 वाजता सुटेल .
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस साठी पहिली लोकल GN 48 असेल जी गोरेगावहून 14.33 वाजता सुटेल.
• गोरेगावसाठी पहिली लोकल GN 45 असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस वरून 14.18 वाजता सुटेल.