
गेल्या 10 महिन्यांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली असून 4 हजार 83 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर 18 जुलैला सोडत निघणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच नोंदणी तसेच अर्ज किक्री-स्कीकृतीच्या प्रक्रियेला सुरुकात होणार आहे. अर्ज नोंदणी 26 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. सोडत कांद्रे येथे रंगशारदाच्या सभागृहात निघणार आहे.
मुंबईत अनेक वर्षे राहूनही घर नसलेल्या सर्वसामान्य, नोकरदार, व्यापारी, खासगी आणि सरकारी अधिकाऱ्यांसह विविध जाती-जमाती तसेच विशेष प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या गटांसाठी मुंबई म्हाडा लॉटरी म्हणजे डोक्यावर स्वस्त आणि हक्काचे घर देणारी संस्था आहे. त्यामुळे मुंबई म्हाडा लॉटरीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, अनेक कारणांमुळे लांबलेल्या या लॉटरीला आता मुहूर्त मिळाला असल्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनामत रकमेत वाढ होणार
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सोडतीवेळी अनामत रकमेत वाढ करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, नंतर तो रद्द करण्यात आला. मात्र, मुंबई मंडळाच्या सर्व गटांच्या अनामत रकमेत वाढ केली जाणार आहे, अशी माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
तिसऱ्या दिवसापासून घराची रक्कम भरता येणार
मुंबई मंडळातील घरे रेडी पोजिशनमध्ये आहेत. त्यामुळे सोडतीनंतर लगेच तिसऱ्या दिवसापासून घराच्या रकमेचा भरणा करण्याबाबतची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घरेही लवकरात लवकर मिळणार आहेत.
> सोडतीतील 4 हजार 83 घरांपैकी अत्यल्प गटासाठी 2 हजार 788, अल्प गटासाठी 1 हजार 22, मध्यम गटासाठी 132, उच्च गटासाठी 39 तर विखुरलेली 102 घरे आहेत.
> अत्यल्प गटात गोरेगावमधील पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेत 1 हजार 947, ऍन्टॉप हिलमध्ये 417 आणि विक्रोळीतील कन्नमवारनगरमधील 424 अशी एकूण 2 हजार 788 घरे आहेत.
> अल्प गटात एकूण 1022 घरे असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील 736 घरे आहेत. उर्वरित घरे दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाडनगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवारनगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा येथे आहेत.
> मध्यम गटासाठी मंडळाकडे 132 घरे असून ती दादर, टिळकनगर (चेंबूर), सहकारनगर (चेंबूर), कांदिवलीत आहेत.
> उच्च गटासाठी केवळ 39 घरांचा समावेश असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव, शिंपोली, तुंगा-पवई इथे आहेत.
घराच्या किमती 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत
मुंबईत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी घरे असून चटई क्षेत्रफळानुसार घरांच्या किमती ठरणार आहेत. साधारणपणे अत्यल्प गटासाठी घराची सुरुकात 30 लाखांपासून होणार असून उच्च गटातील घर साधारणपणे 7 कोटींपर्यंत जाणार आहे.






























































