
सामना ऑनलाईन । अबुधाबी
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. ब्राझीलमधल्या 17 वर्षीय एका मुलीने दिलेल्या तक्रारीवरून त्याला ही अटक करण्यात आली आहे. मिकाने आपल्याला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा या मुलीचा आरोप आहे. या प्रकरणी मुराक्काबात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहाटे 3 वाजता दुबईतून त्याला अटक करण्यात आली आहे.
























































