
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र आजही काही खेडय़ापाडय़ांमध्ये राहणाऱया मुलांना मोबाईल, कॉम्प्युटरसारखी साधने उपलब्ध होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याकरता एका शिक्षकाने अनोखी शक्कल लढवत चक्क स्कुटीवर चालती-फिरती शाळा सुरू केली आहे.
मध्य प्रदेशातील सागर जिह्यातील सरकारी शाळेत शिकवणाऱया चंद्र श्रीवास्तव या शिक्षकाच्या अनोख्या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या स्कुटीला मिनी स्कूल आणि ग्रंथालयाचे स्वरूप दिले आहे. या स्कुटीवर गावोगावी फिरून ते मुलांना शिकवतात. स्कुटीच्या एका बाजूला त्यांनी फळा लावला असून दुसऱया बाजूला मिनी लायब्ररी तयार केली आहे.
त्यातून मुले आपल्याला आवडती पुस्तके वाचायला घेऊ शकतात. श्रीवास्तव सांगतात, माझे अनेक विद्यार्थी हे गरीब घरातील आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोन घेणे त्यांच्या पालकांना परवडणारे नाही. बहुतेक भागात इंटरनेटसाठी नेटवर्कदेखील नाही. त्यामुळे मी स्कुटीवर शाळा सुरू केली.
























































