लातूरमध्ये अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला पळवले, गुन्हा दाखल

लातूरमध्ये एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जुना औसारोड भागातील यशवंत नगर येथून अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. दसर्‍याच्या दिवशी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील जुना औसा रोड भागातील यशवंत नगर येथून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले.

मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस मुलीचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या