तरुणीसोबत अश्लील चाळे; सहकाऱ्यावर गुन्हा

पिकनिकसाठी गेलेल्या तरुणीवर हॉटेलमध्ये तिच्या सहकाऱयाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

पीडित तरुणी ही अंधेरी येथील खासगी कंपनीत काम करते. गेल्या आठवडय़ात तरुणी आणि 9 जण हे पिकनिकला गेले. पिकनिकनंतर ते ट्रेकिंगला जाणार होते. रात्री ते सर्व जण हॉटेलवर पोहचले. दुसऱया दिवशी झोप पूर्ण न झाल्याने तरुणीने ट्रेकिंगला जाण्यास नकार दिला. तिच्यासोबत एक जण रूममध्ये होता. काही वेळाने तो तरुणीच्या जवळ आला.  झोपेत असताना तरुणीला अश्लील स्पर्श होत असल्याचे जाणवले.