प्लॅस्टिकचा कचरा, बंद स्वच्छतागृह; शिवनेरी किल्ल्यावरील ढिसाळ कारभारामुळे पर्यटकांना मनस्ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. शिवभक्त, इतिहास संशोधक, अभ्यासक साऱ्यांनाच मनस्ताप देणारे, वेदनादायी ठरणारे चित्र आज गडावर पाहायला मिळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी ना येथे पुरेसे शुद्ध पाणी, ना पुरेशी विजेची व्यवस्था, जागोजागी अस्ताव्यस्त पसरलेला कचरा यांसह गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशा सुरक्षा कर्मचाऱयांचाही अभाव येथे पाहायला मिळतो. किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक असणारी जागरूकता नसल्याने पडलेल्या दारूच्या बाटल्या, सिगारेट, गुटख्याची पाकिटे आणि खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, बंद स्वच्छतागृहे सारंच संतापजनक आहे. त्यातच ही सर्व व्यवस्था पाहायची कोणी? या खात्याने की त्या खात्याने? हा ‘लाल फीतशाही’ कारभार आहे. शिवजयंतीपूर्वी हे सारे अडथळे दूर व्हावेत आणि शिवनेरीवर येणाऱ्यांना इतिहासाचे साक्षीदार होता यावे, हीच अपेक्षा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला किल्ला शिवनेरी हे सर्वांचेच प्रेरणास्थान! त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून रोज शेकडो नागरिक किल्ले शिवनेरीला भेट देतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून किल्ले शिवनेरीला केंद्र सरकारने घोषित केले आहे.

हिंदवी स्वराज्याचा वैभवशाली इतिहास असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्याला ‘पिकनिक स्पॉट’चे स्वरूप आले असून, त्यामुळे गडांचे पावित्र्य नष्ट होत आहे. गडावर दारूच्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेट आणि गुटख्याची पाकिटे, खाद्यपदार्थांच्या रिकाम्या प्लॅस्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. वास्तविक पाहता गडावर प्रवेश करतानाच, प्रत्येक पर्यटकाची तपासणी करणे गरजेचे आहे. दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू आधीच काढून घेण्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. मात्र, ‘शिवनेरी’वर सुरक्षारक्षकच नाहीत.

शिवनेरी गडाच्या पायथ्यापासून पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पाणी साठविण्यासाठी गडावर टाक्या आहेत. पर्यटकांची संख्या वाढली की, पाणी अपुरे पडते. तसेच टाक्यांभोवती पाण्यासाठी पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना येथील चेंगराचेंगरीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पाण्याची आणखी व्यवस्था आवश्यक आहे.

जुन्नर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचा पुरेशा सुविधांअभावी हिरमोड होत आहे. येथे अनेक सुखसुविधा असल्याचे प्रशासनाकडून भासवले जाते. येथील शिवजन्मभूमीजवळील व बालराजे शिवराय व जिजामाता यांच्या पुतळ्यामागील स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत. शिवकुंज येथील स्वच्छतागृहात मोठय़ा प्रमाणावर घाण साचलेली आहे. पर्यटक विशेषतः महिला पर्यटक चांगल्या स्वच्छतागृहांअभावी संताप व्यक्त करताना दिसतात.

शालेय विद्यार्थी—विद्यार्थिनी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नसल्यामुळे उघडय़ावरच शौचाला बसल्याचे नेहमी दिसते. किल्ल्याची देखभाल पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग तसेच वन विभाग यांच्याकडे आहे. मात्र, केवळ कोणी मोठी राजकीय व्यक्ती येणार असेल किंवा शिवजयंतीच्या काळात येथे साफसफाई व सुविधा पुरविल्या जातात. इतरवेळी येथे अनेक पर्यटकांना व शिवभक्तांना त्रास सहन करावा लागतो.

याबाबत तहसीलदार रवींद्र सबनीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, शिवजन्मभूमीजवळील स्वच्छतागृह हे पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असते. ते चालू ठेवण्यासाठी त्यांना सूचना करण्यात येतील. वन विभागाच्या अखत्यारीतील काही स्वच्छतागृहे सुरू आहेत आणि जी बंद आहेत, तीसुद्धा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतील. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येतो. शिवभक्तांची गर्दी पाहाता पिण्यासाठी पाण्याची सुविधा तोकडी असते.

पुरेसे व मोठय़ा प्रमाणावर पिण्यासाठी पाणी ठेवावे. गडावर असलेला प्लॅस्टिकचा कचरा, वाळलेल्या काडय़ा, काठय़ा, पालापाचोळा या तत्काळ हटवाव्यात. विशेष म्हणजे साखळदंड रस्त्याकडेला असलेला प्लॅस्टिकचा कचरा तत्काळ उचलावा, अशी मागणी शिवप्रेमी करताहेत.

गडाकर शिककालीन गंगा, जमुना टाक्या आहेत. त्याचादेखील पिण्यासाठी कापर केला जातो. तसेच कन किभागाच्या कतीने गडाकर असलेली झाडे क त्यांना पाणीपुरकठा करण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठीदेखील कडज धरणातून पाणी किल्ल्याकर ‘उपसा सिंचन योजने’द्वारे घेतले आहे.

पुरातत्क किभागाच्या अखत्यारीतील ज्या कस्तू संरक्षित आहेत, त्याची देखभाल करण्यासाठी तीन लोक कायमस्करूपी असतात. तसेच दहा कर्मचारी कामगार म्हणून काम करतात, अशी माहिती पुरातत्व किभागाचे अधिकारी जंगले यांनी दिली.

z शिवनेरी गडावर सुमारे 142 हेक्टर जमीन ही वन विभागाच्या अखत्यारीत येते. याशिवाय पुरातत्व विभागाच्या ताब्यात दोन ते अडीच हेक्टर जमिनीवर विविध वास्तू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पायवाट रस्ता व महसूल विभागाकडे तत्सम बाबी देखभाल-दुरुस्तीसाठी आहेत. असे असताना केवळ दोन ते अडीच हेक्टर जागा असलेला पुरातत्व विभाग त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पुरातत्व विभागाच्या थेट दिल्लीवरून परवानग्या आणाव्या लागतात. वृक्षारोपणासाठीही वन विभागाला पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते.