‘फिट असतानाही वर्ल्डकपमधून हाकलले’, अफगाण खेळाडू ढसाढसा रडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अफगाणिस्तानाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद याला वर्ल्डकप क्रिकेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे वादळ आले असून शहजादने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप लगावला आहे. फिट असतानाही अनफिट घोषित करून संघातून बाहेर काढल्याचा आरोप शहजादने केला आहे. वर्ल्डकपमधून बाहेर काढल्यामुळे शहजाद भावूक झाला आणि ढसाढसा रडला.

वर्ल्डकप 2019 मध्ये अफगाणिस्तानचा संघ 3 लढतीत खेळला असून या सर्वच सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर रविवारी यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद गुडघ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकणार असल्याचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. पाकिस्तानविरुद्धच्या सराव लढतीत त्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यानंतरही तो ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळला. शहजादच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज इकरम अली खील याचा संघात समावेश करण्यात आहे. परंतु या निर्णयामुळे शहजाद दुखावला गेला असून त्याने क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केला.

शहजाद म्हणलो, मी नेट्समध्ये सराव करत असताना टीम मॅनेजरने मला बोलावले आणि सांगितले की तू अनफिट आहेस आणि तुला अफगाणिस्तानला परत जावे लागणार आहे. माझ्या गुडघ्याची दुखापत जुनी होती आणि त्यातून मी जवळपास बराही झालो होते. फिजिओने मला थोडा आराम केल्यास सर्व ठिक होईल असे सांगितले, परंतु अचानक मला संघातून बाहेर काढण्यात आले. हे सांगताना शहजाद भावूक झाला आणि रडू लागला.